*नागपूर शहरातील दिघोरी परिसरात वैभव नगर येथे बुद्ध विहार व हनुमान मंदिराच्या प्रांगणात, जागतिक महिला दिन व सावित्री फुले स्मृतिदिन संपन्न ---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
नागपुरात आज ,जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, बुद्ध विहार व हनुमान मंदिर प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमास नागपूर शहर व आसपासच्या परिसरातील महिला वर्गांची उपस्थिती लक्षवेधी होती. नागपूर येथे झालेल्या सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले ,त्याचप्रमाणे प्रमुखातिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ,युवा नेते गिरीश पांडव, महिला बालकल्याण सभापती अवंतिका ताई लेकुरवाळे, नागपूर शहर काँग्रेसचे गजराज हटेवार, वसंतराव गाडगे ,दर्शनताई मेश्राम, डॉ. ज्योतीताई ढगे उपस्थित होते. आज येथील झालेल्या जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन या कार्यक्रमात, विविध सन्मानिय वक्त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून, त्यांच्या कार्याविषयीची माहिती उपस्थित महिला वर्गांसमोर प्रकट केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधनाताई फुलझेले व आभार प्रदर्शन ममताताई गजभिये यांनी केले. सदरहू कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रकाश ढगे ,विनाताई कुकडे, रंजनाताई कडुकर, माधुरीताई व्हरांडे ,सिद्धार्थ फुलझेले, आसाराम गेडाम, मदन बोबडे ,भाऊराव ढोक, राहुल अभंग, डॉ. वसंतराव रहाटे, राहुल घरडे ,गोकुळदास मेश्राम, नीताताई डोंगरे ,शालिनी कांबळे, रेखाताई बसेशंकर आणि बहुसंख्य महिला नागरिक उपस्थित होते.