*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )महाराष्ट्र राज्यात आज रामनवमीचा उत्सव अपूर्व अशा उत्साहात विविध ठिकाणी साजरा झाला आहे. राज्यातील रामभक्तांच्या मध्ये फार मोठा आनंद, रामनवमीच्या दिवशी द्विगुणीत होत असल्याचे दिसून आले. राज्यातील विविध ठिकाणी रामनवमी धुमधडाक्यात साजरी झाली आहे. या निमित्य महाराष्ट्रात शिर्डी ,नागपूर, नाशिक, सातारा, सांगली, शेगाव, मुंबई शहरासह राज्यात ठिकठिकाणी रामनवमीचा उत्सव साजरा झाला आहे. राज्यातील विशेषतः शिर्डी येथे साईबाबांच्या मंदिरात ,साईनामांच्या जयघोषाने रामनवमी दिवशी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला आहे .आज सकाळपासून शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात ,साई भक्तांच्या- रामभक्तांच्या पहाटेपासून रांगाच रांगा लागल्या आहेत. राज्यातील विविध साई भक्तांच्या व राम भक्तांच्या पालख्या, शिर्डीत पायी दाखल झाल्या आहेत. शिर्डी येथील साई मंदिरात, साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने घेतला आहे.
शेगावात संत गजानन महाराज मंदिर येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे दिसून आले .जवळपास 500 दिंड्यांसह ,अडीच ते तीन लाख भक्त शेगावात दाखल झाले आहेत.आज दिवसभर शेगावात संत गजानन महाराज मंदिरामध्ये, रामनवमीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू झालेल्या रामनवमीच्या उत्सवाला, आज शेगावात संत गजानन महाराजांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा केला गेला. महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी राम जन्मोत्सव प्रचंड उल्हासात साजरा होत आहे. राज्यातील रामभक्तांच्या मध्ये रामनवमीच्या दिवशी अलौकिक उत्साह ,आनंद ओसांडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.