*मुंबई महिला प्रीमियर लीग क्रिकेट लीग स्पर्धेत, दिल्ली कॅपिटल्स ने रॉयल चॅलेंजर्सवर मिळवला रोमहर्षक विजय--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
मुंबईत आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ,दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स वर 60 धावांनी रोमहर्षक विजय प्राप्त केला. बंगळूर संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 2गडी गमावून 223 धावा केल्या. यात शेफाली वर्माच्या 84, कर्णधार मेग लॅनिंगच्या 72 धावांचा समावेश होता. मारीजा कॅपने नाबाद 39 व जिमीमाह रॉड्रीग्जनं नाबाद 22 धावा केल्या.
दरम्यान विजयासाठी आवश्यक असलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना, बंगळूर संघाला 20 षटकात 8 गडी गमावून 163 धावसंख्या करता आली. त्यात स्मृती मानधनाच्या 35 धावा, हिदर नाईटने 34 , एलीस फेरीनने 31, मेगन शटनने 30 धावा केल्या. दिल्लीच्या टॅरा नोरिसनने 5 गडी बाद केले.