जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर येथे सागरेश्वर सूतगिरणीच्या कार्यालयात, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन व मार्गदर्शक शांताराम बापूसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, आज लोकनेते मोहनराव कदम खरेदी विक्री संघ (कडेगाव तालुका) विद्यमान चेअरमन ,व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला .कुंभार कुटुंबीयातील सदस्य श्री. जगन्नाथ श्रीपती कुंभार यांनी ,35 ते 40 वर्ष स्वर्गीय ना.डॉ. पतंगराव कदम साहेब तसेच लोकनेते आदरणीय मोहनराव कदम दादा यांचे शब्द हेच प्रमाण मानून प्रामाणिकपणे काम केले असून, कधीही आयुष्यात दुटप्पी भूमिका घेतली नाही याचा यथोचित सन्मान म्हणून, माननीय मोहनराव कदम खरेदी विक्री संघ (कडेगाव तालुका) संचालक पदी सौ शकुंतला प्रमोद कुंभार यांची बिनविरोध निवड केली आहे
. त्याबद्दल समस्त कुंभार कुटुंबीयांच्या वतीने माननीय शांताराम बापूसाहेब कदम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. लोकनेते मोहनराव कदम खरेदी विक्री संघ (कडेगाव तालुका) विद्यमान चेअरमनांसह व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.