( अनिल जोशी )
सांगलीमध्ये, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर महासंघाच्या मान्यतेने व विजयंता मंडळाच्या आयोजनाने, स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका यांच्या विद्यमान्वये, *महापौर चषक* आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मैदान भरवण्यात आले असून, भारत विरुद्ध इराण अशा कुस्तीचा थेट थरार रंगणार असून, कुस्ती रसिक शौकीनाना अनुभवता येणार आहे. भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती, पैलवान माऊली कोकाटे ,हनुमान आखाडा, पुणे (भारत) व पैलवान हमीद इराणी (इराण) यांच्यात 1 नंबरची कुस्ती होणार आहे. रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4:00 वाजता, सरकारी घाट, आयुर्विन पूल येथे कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केल्या असून, या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व आयरन मॅन राहुल रोकडे व मोहन चोरमुले यांचा समावेश आहे. भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा, रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता, मारुती चौक सांगली येथे होणार आहेत, तसेच सांगलीत प्रथमच हातगाडा शर्यत, दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी 7:00 सात वाजता, मारुती चौक येथे होणार आहे. तसेच भव्य जातिवंत घोड्यांच्या चालींचे प्रदर्शन हे, रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये भरवण्यात येणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाबरोबरच सांगली जिल्हा रिक्षा मालक संघटनेच्या वतीने ,भव्य अडथळ्याच्या रिक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता, ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे होणार आहेत. या सर्व स्पर्धेनंतर, मिस्टर वर्ल्ड टायटल बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण यांचा कुस्ती मैदानाच्या ठिकाणी शो होणार आहे .या सर्व स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असून, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व स्पर्धेला भव्य बक्षिसे ठेवण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय होणाऱ्या कुस्तीसाठी विशेषतः , राज्याचे उच्चतंत्र शिक्षण उद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.