शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागणीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला भव्य मोर्चा...!
प्रतिनिधी: शैलेश माने.
शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटीलगटनेता काँग्रेस विधानपरिषद अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चास आजी माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, महानगरपालिका महापौर, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष,. शहर ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, इंटक संघटना, ओबीसी सेल, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक सेल, असंघटित कामगार सेल, सांस्कृतिक सेल, परिवहन सेल, रोजगार स्वयंरोजगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, शिक्षक सेल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.