*महाराष्ट्र राज्यातील सांगली मधील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांसाठी केंद्र शासनाकडून आठ कोटी रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त-- महापालिका आयुक्त सुनील पवार.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील 19 शहरांमध्ये समावेश असलेल्या, *सांगली* शहराचे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी व उपाय योजनेसाठी, केंद्र शासनाकडून महापालिकेस आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे .त्यानुसार माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाला देण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे .सद्य परिस्थितीत केंद्र शासनाने हवेच्या प्रदूषण रोखण्यासह कायमस्वरूपी उपाययोजने करणे करिता निर्देश दिले असून, त्यासाठी सदरहू आठ कोटीचा निधी वापर करणेचा आहे. सध्या सांगलीत धुळीमुळे हवे मधील प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले असून, यामुळे सांगलीतील नागरिकांना विविध रोगांचा सामना करावा लागत आहे .सांगली शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात उपाययोजनांसह विशेषत्वाने भर दिला जाणार आहे .दरम्यान सांगलीतील विश्रामबाग चौक, राजवाडा चौक, कुपवाड मध्ये आर. पी. पाटील चौक, मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे हवा शुद्धीकरणांची यंत्रे बसवली जाणार आहेत सांगलीतील धुळीमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणातील पातळी कमी करण्यासाठी, सन 2025- 26 पर्यंतचा एक आराखडा प्रकल्प तयार करण्यात येणार असून, त्यासाठी खाजगी एजन्सी मार्फत याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील 19 शहरांमध्ये अकोला, लातूर ,पुणे, अमरावती, बदलापूर ,मुंबई ,नवी मुंबई ,उल्हासनगर, सांगली कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर, वसई -विरार आदी आदी शहरांना हवेच्या प्रदूषणाने प्रचंड ग्रासले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतर्फे ,माझी वसुंधरा अंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
Contact 9270135000