सांगलीतील नांद्रे रोडवरील नावरसवाडी ओढ्यावरील चालू असलेल्या पुलाच्या कामावर मोठे बोर्ड लावून, पट्टे मारून ,रात्रीच्या वेळेला लाईट लावण्याची मागणी--- नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा नेते सतीश साखळकर.
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीतील नांद्रे रोडवरील नावरसवाडी ओढ्यावर पुलाचे सध्या काम सुरू आहे. पूर्वीचा अस्तित्वातील जुना पूल पाडण्यात आला आहे .रस्त्यावर डायवर्षण करण्यात आले असून, रस्ता फार अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी फार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रकार सुद्धा सध्या घडत आहेत .सध्याचे अस्तित्वातील अरुंद डायवर्षण रुंद करण्यात येऊन, त्या ठिकाणी मोठे बोर्ड लावण्यात यावेत तसेच पट्टे मारण्यात यावेत,
रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी वाहनांच्या सोयीसाठी लाईट लावण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांचेकडे केली आहे.