जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
देशातील व महाराष्ट्रातील कांद्याचे भाव सद्यस्थितीत घसरत असल्याने, शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्यासाठी, केंद्र शासनाने व राज्य शासनाने नाफेड मार्फत कांदा सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी सांगितले. त्यामुळे कांद्याच्या सध्याच्या भावात सुधारणा होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार यांनी केले आहे केले आहे. नाशिक जिल्ह्यात लालसगाव मधून कंपनीच्या माध्यमातून नाफेड कांदा खरेदी करत असून ,आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाफेड मधील कांद्या खरेदी केंद्राला भेट दिली. यापूर्वी नाशिक मधील नाफेड कांदा खरेदीचा दर ४५० रुपये होता, तो आता ९५० रुपये झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली .दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाफेड मधील कांदा खरेदी ,शेतकऱ्यांच्या कडून होण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप केला होता. सध्य परिस्थितीत फार्मा प्रोड्युसर कंपनी मार्फत प्रत्येक बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करणे सुरू असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नमूद केले आहे .आज पर्यंत एकूण नाशिक मधील नाफेड केंद्राने 2400 टन कांद्याची खरेदी केले असल्याचे नमूद केले आहे.