जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगली शहरात सध्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, नागरिकांना ताप -सर्दी -खोकला- घसा दुखणे -अशक्तपणा अशी लक्षणे असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच महापालिका क्षेत्रात कोरोना आणि इन्फ्लुएंजा या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळत असून, मधुमेह, किडनी, कर्करोग ,रक्तदाब आदी आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग ,सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने केले आहे. आरोग्य विभाग ,सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनामार्फत, आरोग्यविषयक स्थितीचा ,सांगली शहरातील आढावा घेण्यासाठी, व्यापक सर्वे मोहीम हाती घेतली असून, यासाठी आशा वर्कर- आरोग्य सेविका मार्फत सर्वे सुरू आहे. सांगली शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे, अँटीजन व आर.टी.पी.सी.आर. टेस्टचे नमुने घेण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना, शासनाच्या नियमानुसार होमआयसोलेशन मध्ये ठेवून ,योग्य ते उपचार दिले जात आहेत. दरम्यान ज्या नागरिकांनी कोविड-19चे लसीकरण घेतले नसेल, त्यांनी लसीकरणाचा पहिला- दुसरा- बुस्टर डोस घ्यावा तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चा वापर करून, आरोग्य प्रशासन सांगली मिरज कुपवाड महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे यांनी केले आहे.