कोल्हापूर प्रतिनिधी: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक "इको फ्रेंडली रंगपंचमी " साजरी करण्यात आली. यावेळी *"पाणी वाचवा देश वाचवा"* अशा घोषणा देत आज मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे रंगपंचमी साजरी केली.
या वेळी
माजी नगरसेवक ईश्वर परमार आणि चॅनल बी चे मुख्य बातमीदार प्रमोद व्हणगुत्ते यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली.
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी बोलताना ते म्हणाले ,, रंगपंचमी उत्सव साजरा करत असताना
पाण्याचे महत्व किती आहे याबद्दल सांगितले दिशादर्शक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दिशादर्शक फलकावर
*पाण्याविना नाही प्राण,*
*पाण्याचे तू महत्त्व जाण...*
*थोडे सहकार्य थोडी नियोजन,*
*पाणी फुलवे आपले जीवन!*
पाण्याचे महत्व संदर्भात वाक्य लिहिण्यात आले होते
यावेळी पत्रकारांचे मित्र माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले,,कोल्हापूर जिल्हा हे पुरोगामी जिल्हा असून राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्यासाठी भविष्यातील शंभर वर्षे पाण्याची कमतरता भासणार नाही याचे दूरदृष्टी लक्षात घेऊन त्या काळी नियोजन करून ठेवले आहे म्हणून कोल्हापूर वासियांना पाणी कधी कमी पडणार नाही तरीही अनेक जिल्ह्यात विदर्भात पाण्याची कमतरता भासत असते आपल्याकडे मुबलक पाणी असलं तरीही काटेकोर नियोजन करून जपून वापरल पाहिजे युवा पत्रकार संघाने घेतलेला इको फ्रेंडली रंग पंचमी उत्सव कौतुकास्पद प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम पुढील काळामध्ये ग्रामीण भागातही राबवले पाहिजे असे मत व्यक्त करून सर्व पत्रकार बंधू भगिनींना व उपस्थित यांना शुभेच्छा दिल्या
चॅनल बी न्यूज चे मुख्य बातमीदार प्रमोद व्हनगुते यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,, युवा पत्रकार संघाचे कार्य खरोखरच चांगले असून गेल्या काही वर्षापासून श्रमिक पत्रकांसाठी विविध उपक्रम राबवून पत्रकारांच्या हितासाठी लढत आहे पुढील काळामध्ये माझ्याकडून कोणती मदत लागली तर मी करणार असून *"जल है तो कल है"* असे बोलून शुभेच्छा दिल्या
शेवटी युवा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शरद माळी यांनी सर्वांचे आभार मानले
या वेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य कार्याध्यक्ष रतन हुलस्वार,
प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी, कोकण विभागीय उपाध्यक्ष अमोल पोतदार, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी, प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र कळंत्रे, करवीर तालुका अध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, संघाचे पदाधिकारी नियाज जमादार, प्रगतधाराचे संपादक पंडितराज कर्णिक, प्रदीप चव्हाण, आणि पत्रकार संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.