महाराष्ट्र राज्यात सर्वत्र होळी हा सण उत्साहाने, उत्साहवर्धक साजरा
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी होळी साजरी करून, विजयाचे प्रतीक असलेल्या होळीच्या सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होळीचा सण सर्वत्र पारंपारिक रीतीने, अनिष्ट प्रथा- वाईट विचार यांचे दहन करून, साजरा करण्यात आला .काही ठिकाणी निसर्गप्रेमी संघटनांनी केलेल्या आव्हानानुसार, प्रतीकात्मक रुपात होलिका दहन करून ,नागरिकांनी सण साजरा केला आहे .पर्यावरणपूर्वक निसर्गाशी संतुलन साधणारा होळीचा सण साजरा करून, राज्यातील नागरिकांनी जागरूकता ठेवावी अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे .त्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना त्यांनी, होळी सणाचा उत्साह ,सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी व आनंदाच्या क्षणांनी उधळण व्हावो अशा शुभेच्छा दिल्या आहे. राज्यातील शांततेचे, सुव्यवस्थेचे ,सामाजिक सलोख्याचे, विषय लक्षात घेऊन सण साजरे करावेत. होळी सण पर्यावरण पूर्वक साजरी करून, धुलीवंदनामध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने देखील होळी सण साजरा करताना, राज्यातील नागरिकांनी वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफॉर्मर संबंधित ठिकाणी नसल्याची खात्री करून, विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी व हा सण साजरा करावा असे आवाहन केले आहे .महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याच्या जनतेला, होळी सणाच्या व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या असून, परस्पर प्रेम- स्नेहा -बंधुभावाचे प्रतीक असलेला धुलीवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद भरून द्विगुणित व्हावा असे म्हटले आहे.