मराठी अभिमान
नऊवार साडी, किमान ५० किलोचा पाईप गाडीवर सांभाळत, डोक्यावरचा पदर न पडू देता, आपल्या शेतकरी पतीला साथ देणारी स्त्री पाहिली की असे वाटते, शक्ती स्वरूपाचे दर्शन केवळ मंदिरातच होते असे नाही..
गाडीवर हवेच्या विरोधात हे वजन पेलणे सोपे नसते.. ज्यांनी केले असेल त्यांना माहीत आहे.. अशा स्थितीत देखील तिला पदर पडू द्यायचा नाही.. तिने जपलेल्या संस्कृतीच्या मान्यता तिला अशक्य कार्य करतानाही जपायच्या आहेत. संसार सांभाळते, पतीला साथ देते आणि संस्कृती सांभाळते.. शक्ती स्वरुपासमोर नतमस्तक!
सलाम जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:---