*सांगलीत जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वयंपाकाच्या गॅसच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात आंदोलन---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीत सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, स्वयंपाक गॅसच्या दरात व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीबद्दल, रस्त्यावर चूल पेटवून निषेध आंदोलन करण्यात आले .गेले काही दिवस स्वयंपाक गॅसचे दरात व जीवनावश्यक वस्तूंचे दरात सातत्याने वाढ होऊन, गगनाला भिडत आहेत. सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वयंपाक गॅसच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होत असलेल्या वाढीबद्दल रस्त्यावर चूल पेटवून तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले ." *सामान्यांचे दुखते डोके, गद्दारांना 50 खोके"," या सरकारचे काय, खाली डोके वर पाय"* अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, छाया जाधव ,अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे ,ज्योती अदाटे ,अलका माने ,सुनीता देशमाने ,नलिनी पवार, सुरेखा कोळेकर ,माणिकताई माळी, मृदुला कुलकर्णी, साधना पाटील, प्रतिभा पाटील आदि सर्व महिला कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे आंदोलनाच्या स्थळी महिला वर्गांची उपस्थिती लक्षवेधी होती.