*जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी, तहसील कार्यालयावर निवेदन देऊन राज्यव्यापी संपावर----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील तहसील कार्यालयावर, आज जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी, शासकीय, निमशासकीय ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक मोर्चा काढून निवेदन देऊन, राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सुरुवात केली आहे .सर्व कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात आले असता,या आंदोलनात मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आंदोलन स्थळी येऊन, त्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देऊन सहभागी झाले होते .
सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ.जगदीश दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश VJNT विभागाच्या प्रदेशाध्यक्षा एडवोकेट सौ. पल्लवीताई रेणके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बदल तुषार गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस VJNT विभागाचे प्रवक्ते एडवोकेट अरविंदजी गोसावी, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भोईसर, जिल्हा उपाध्यक्ष( एस. सी. विभाग) बी.डी. गवई साहेब, सेवादल तालुका अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते शामराव भोई, मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष अनिल वाडीले, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष निखिल चौधरी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, बाबुलाल भाऊ बोराडे, मुक्ताईनगर तालुका सेवा दल महिला अध्यक्षा सौ. सुमन संजय चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने संपात भाग घेऊन तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन दिले.