*महाराष्ट्र राज्यातील वन्य प्राण्यांच्या हल्लाग्रस्त नागरिकांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम वेळेत देणार, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्याज वसूल करणार-- वनमंत्री सुधीर* *मुनगंटीवार* .
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तसेच पिकांची नुकसानी- नासाडी झालेल्या शेतकऱ्यांना, भरपाईची रक्कम कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसाच्या आत दिली जाईल. याबाबतीत दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर, सरकारी दराने व्याज वसूल करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाईल असे आश्वासन विधानसभेत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिले. सद्यस्थितीत शहरातील नागरी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढला असून, मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे नागरिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे सुमारे पाचशे जनावरे ठार झाली असून, या हल्ल्यांमध्ये एका लहान मुलाचाहि मृत्यू झालेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या विधानसभेतील प्रश्नाला उत्तर देताना, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वरील आश्वासन दिले .सदरहू चर्चेत आमदार समीर कुन्नावार, आमदार अनिल बाबर, आमदार नाना पटोले, आमदार दिलीप वळसे पाटील आदींनी भाग घेतला होता. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना मदतीची रक्कम देण्यात, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, कारवाई करण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसाच्या आत रक्कम देणे बंधनकारक करण्यासाठी, वेळप्रसंगी कायदा करण्यात येईल, शिवाय दिरंगाई करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, संबंधित रकमेवर सरकारी दराने व्याज वसूल करून, संबंधितांना रक्कम वाटली जाईल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. राज्यात वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान, नागरिकांच्यावर होणारे हल्ले, शिवाय हल्लाग्रस्त नागरिकांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत यांच्या अभ्यासासाठी व उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची व अधिकाऱ्यांची एक समिती नेमली जाईल .या समितीचा अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईल असे राज्याचे वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी, बिबट्याच्या प्रजननाबाबतीत उपायोजना करण्यासाठी सूचना केली .आमदार अनिल बाबर यांनी वन अधिकाऱ्यांच्याकडे बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जेव्हा गावकरी सांगतात, त्यावेळेला बिबटे गावाजवळ आले तर गाणी लावा असे सल्ले वनअधिकाऱ्यांकडून दिले जातात.राज्यातील वन्यप्राण्यांकडून नुकसान होत असलेल्या एक लाख शेतकऱ्यांना ,कुंपण घालून देण्यात येईल अशी घोषणा विधानसभेत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.