*महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे, सलग तिसऱ्या दिवशीही सरकारी कामकाज ठप्प ----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात शासकीय- निमशासकीय कर्मचारी, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर गेले असून, आज सलग तिसऱ्या दिवशी सरकारी कामकाज ठप्प झाले
आहे .शासकीय- निमशासकीय सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्यामुळे, या संपाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होत असून ,सध्याच्या परिस्थितीत नागरिकांची सरकारी कामकाजात परवड होत आहे. सरकारी कामकाजासह राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांचे देखील, ह्या गोष्टीमुळे अतोनात हाल होत आहेत. शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका, हा फार मोठा सर्वसामान्य नागरिकांना व रुग्णांना बसत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतीच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी, स्थापन केलेली तीन सदस्य समिती देखील ,शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या समितीस मान्य नाही. काही ठिकाणी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरती अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या तीन सदस्य समितीस, तीन महिन्याची मुदत देऊन, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजने संदर्भात अभ्यासात्मक अहवाल व शिफारस करणे सांगण्यात आले आहे.
सध्या तरी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जरी व्यवस्थित सुरू असल्या तरी, शिक्षकांनी दहावी- बारावीचे पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकल्याने, लाखो विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे दिलेले लाखो पेपर तपासणी शिवाय कडून आहेत. शिवाय राज्यातील परीक्षांचे निकाल वेळेवर लागतील असे सांगता येत नाही .महाराष्ट्र राज्यातील बोर्डांचे निकाल हे ठरलेल्या वेळेत लागू शकणार नसून ,यात बराच कालावधीचा विलंब होऊ शकतो असे चित्र दिसत आहे.