जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्यात आज सायंकाळपासून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई ,नंदुरबार ,सातारा, महाबळेश्वर सह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ,आज सायंकाळी पासून पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असून, अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. कोल्हापूर जिल्ह्यातील संध्याकाळी 5:00 वाजण्याच्या सुमारास गारगोटी परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, पावसामुळे गारगोटी मधील मार्केटमध्ये बहुतांशू भागात पाणी साचले होते. यामुळे व्यापारांचे फार मोठ नुकसान झाले आहे .साताऱ्यात देखील अनेक भागात तसेच वाई खंडाळा तालुक्यासह महाबळेश्वरच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याची वृत्त आहे. सातारा जिल्ह्यातील साताऱ शहरासह वाई ,खंडाळा, महाबळेश्वर, लोणंद यासारख्या भागात पावसाने जोरदार वृष्टी केली असल्याचे समजते .त्यामुळे संपूर्ण सातारा शहर व काही तालुक्यांच्या ठिकाणी, बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. पुण्यात देखील सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे ,सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. कोथरूड, डेक्कन ,औंध, पुणे विद्यापीठात परिसरात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पुणे शहरवासीयांची चांगलीच भंबेरी उडाली .अनेक रस्त्यावर वाहतुकींची कोंडी होऊन, नागरिकांना घरी पोहोचण्यास फार उशीर झाला. मुंबईतही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर, नंदुरबार, तळोदा, धडगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह ,विजेच्या गडगडाटासह, अवकाळी पाऊस झाला असून, पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे .गहू ,हरभरा ,रब्बी ज्वारी, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात, पावसामुळे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे .राज्यातील होत असलेल्या अवकाळी पावसामुळे, शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान होत असून, त्यात भरीस भर म्हणून, राज्यातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची कामे खोळंबली आहेत. शिवाय शेतकरी त्यामुळे हैराण झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत फार मोठा फटका बसला आहे.