*भारतात H3 N2 इन्फ्लुएंन्झा या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, सर्व राज्य सरकारांनी उपाययोजना करण्याचे आवाहन-- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
भारतात सध्या H3 N2 इन्फ्लुएंन्झा या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, सर्व राज्य सरकारांना आवाहन करून सूचना केल्या आहेत. नुकतीच नीती आयोग ,केंद्रीय आरोग्य मंत्रालय व विविध मंत्रालयांच्या बरोबर एक आढावा बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जानेवारीमध्ये अॅडीनो या विषाणूचा संसर्ग, सुमारे 25 टक्क्याहून अधिक नमुन्यांमध्ये तपासणी केली असताना आढळून आला आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे .या H3 N2 इन्फ्लुएंन्झा विषाणूमुळे, नागरिकांना थोडा ताप व कफ याचा त्रास संभवतो .मधुमेह, गर्भवती स्त्रिया, लठ्ठ व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, हृदयरोग यासारख्या आजार असणाऱ्या नागरिकांना याचा धोका जास्त असतो. वरील आजार असणाऱ्यां रुग्णांना काही वेळा या विषाणूच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते असे पत्रात नमूद केले आहे .विविध राज्यातील सर्व नागरिकांनी, रुग्णांनी या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शिंकताना ,खोकताना नाकासमोर रुमालाचा वापर करणे ,सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे यासारख्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्या आहेत .त्याच बरोबर राज्य सरकारने या विषाणूचा सामना करण्यासाठी औषधे ,वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन यासह हॉस्पिटले सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर सर्व राज्य सरकारनी आपापल्या राज्यातील आरोग्य यंत्रणेस सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केले आहे. त्यांनी याबरोबरच कोविड चे लसीकरण व H3 N2 इन्फ्लुएंन्झा प्रतिबंधक लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला आहे.