जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाच्या पाहणी दरम्यान ,महाराष्ट्र दिनी म्हणजेच 01 मे 2023 रोजी उद्घाटन होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यामुळे बहुचर्चित चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून , सध्या उड्डाण पुलाच्या कामाला कमालीचा वेग आला आहे, तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी देखील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, उड्डाणपुलाचे काम वेगाने करा असे आदेश दिले होते.
स्वतः त्यांनी काही दिवसापूर्वी उड्डाण पुलाच्या कामाच्या प्रगती बाबतीत पाहणी केली आहे. मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम देखील प्रगतीपथात असून, उड्डाण पुलाचे गर्डर टाकण्याचे काम 15 ते 20 एप्रिल च्या दरम्यान होणार आहे. बहुचर्चित असलेल्या पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. दरम्यान वेद भवन ते मुळशी व बावधन ते सातारा या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, 10 एप्रिल पासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे एनएचए आय कडून कळविण्यात आल्याचे समजते.