जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
अक्कलकोट येथे श्री. स्वामी समर्थ महाराजांची 145 वी पुण्यतिथी, हजारो भक्त भाविकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहाने साजरी झाली. आज अक्कलकोट येथे हजारो भक्त भाविकांनी सकाळपासूनच ,श्री. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. पहाटे 3:30 वाजले पासूनच, अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या दर्शनाकरता, भक्त भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने, मंदिर परिसरात बॅरिकेटिंगची सोय करण्यात आली होती. अक्कलकोट येथे येणाऱ्या भक्त भाविकांना, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने, राजे फत्तेसिंह चौकापर्यंत विशेष कापडी मंडप उभारून सोय करण्यात आली होती .अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे 3:30च्या काकड आरती नंतर, विविध कार्यक्रम संपन्न झाले.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी, श्री स्वामी समर्थ गुरु लिला चरित्रामृत ,भजन सोहळा, धर्म कीर्तन सोहळा ची समाप्ती झाली होती .महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून एसटी बसेस ची सोय, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, अक्कलकोट येथे जाण्यासाठी करण्यात आलेली होती. आज अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिरात, जिकडे पहावे तिकडे स्वामींचा गजर कानी पडत होता एकंदरीत सर्व वातावरण स्वामी समर्थमय झाले होते.