जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
आज नागाव येथे, दि.16 एप्रिल 2023 रोजी तरुण भारत स्टेडियम सांगली येथे होणाऱ्या, वाहनधारकांच्या भव्य मेळाव्याच्या आयोजना बाबतीत, महाराष्ट्र जनता पार्टीचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक बैठक पार पडली. ऊस वाहतूक वाहनधारकांनी संघटीत होऊन संघर्ष करावा असे आवाहन मा.पृथ्वीराज पवार भैया यांनी आज नागाव येथे वाहनधारकांच्या बैठकीत केले.राज्यातील ऊस वाहतूक वाहन धारकांनी संघटीत होऊन संघर्ष केला तरचं येणाऱ्या काळामध्ये वाहन धारक वाचू शकेल अन्यथा त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा पृथ्वीराज पवार भैया यांनी नागांव येथे वाहन धारकांच्या बैठकीत काढले.
रविवार दि.16 एप्रिल रोजी तरुण भारत स्टेडियम मारुती चौक सांगली येथे ऊस वाहतूकदारांचा भव्य मेळावा माजी खासदार मा.राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे त्या निमित्ताने आयोजित केलेल्या वाहन धारकांच्या बैठकीत मा.पृथ्वीराज पवार भैया म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक धारकांची ऊस तोडणी मजुरांच्या कडुन मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे,अशा फसवणूक झालेल्या वाहन धारकांना साखर कारखाने कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार नाहीत.अशा परिस्थितीमध्ये वाहनं धारकांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे.ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहन धारकांची स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे महामंडळामध्ये नोंद व्हावी,वाहन धारकांची फसवणूक करणाऱ्या मुकादमाचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन वाहन धारकांना लवकरात लवकर न्याय मिळावा या व अन्य मागण्यांसाठी होत असलेल्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त वाहन धारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी मा.सदाशिव पाटील, माजी सरपंच मा.दिपक पाटील, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मा.भाऊसाहेब पाटील, सेवा सोसायटीचे माजी संचालक मा.अभयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य मा.सहदेव पाटील, नागेश पाटील,अनुप पाटील, सुरेश सिसाळे, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, अरुण गावडे, महादेव सिद्ध व डॉ.राजेंद्र पाटील उपस्थित होते.