जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )केंद्र सरकारने, मार्च 2023 रोजी पर्यंत केलेल्या जी.एस.टी. कर म्हणजेच वस्तू- सेवा कराच्या रूपाने 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक कर सरकारी तिजोरी जमा करून, एक नवा उच्चांक दुसऱ्यांदा स्थापित केला आहे. यंदाच्या वर्षीचे मार्च 2023 पर्यंतचे जी.एस.टी.चे कर संकलन चांगले झाले असून ,सुमारे 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपयां इतका कर गोळा झाला आहे. जी.एस.टी. कर गोळा करण्याबाबतचा हा नवा उच्चांक असून, असे जवळपास दुसऱ्यांदा झाले आहे. यंदाच्या वर्षीची वाढ ही जवळपास मागील वर्षापेक्षा ,जी.एस.टी.कर संकलनामध्ये 13 टक्क्याने अधिक वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्र सुद्धा पहिल्या क्रमांकावर असून, सुमारे 22 हजार 695 कोटी रुपयें इतका जी.एस.टी. कर जमा झाला आहे. महाराष्ट्र राज्यानंतर गुजरात , तामिळनाडू व हरियाणा मध्ये जी.एस.टी. कर अनुक्रमे 9919 कोटीं रुपयांचा, 9245 कोटी रुपयांचा, 7780 कोटी रुपयें इतका गोळा झाला आहे. महाराष्ट्र राज्या नंतर गुजरात हा दुसऱ्या क्रमांकावर असून ,तामिळनाडू व हरियाणा अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. यंदाच्या वर्षी मार्च 2023 पर्यंतचा गोळा झालेला जी.एस.टी. म्हणजेच वस्तू आणि सेवा कर याबाबती, केंद्र सरकारने फार मोठ्या प्रमाणात कर संकलन करून ,आपल्या सरकारी तिजोरी गतवर्षीच्या तुलनेने 13% ची वाढ दर्शवून मोठी प्रगती केली आहे.