जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यातील बहुतेक ठिकाणी, जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ झाली असून, सर्वसाधारणपणे 40°c चा टप्पा राज्यातील बऱ्याच ठिकाणी ओलांडला गेला आहे. आजच्या दिवशी ठाण्यातील मुरबाड मध्ये, राज्यातील सर्वाधिक तापमान म्हणजे 44 अंश सेल्सिअस आज नोंदवण्यात आले तसेच पुण्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्याच्या गावातील, 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान असलेल्याची माहिती खालील प्रमाणे आहे .चंद्रपूर 43 अंश सेल्सिअस ,पुणे 42 अंश सेल्सिअस, मुरबाड 44 अंश सेल्सिअस, नवी मुंबई 41 अंश सेल्सिअस, कल्याण 42.8 अंश सेल्सिअस, बीड 41 अंश सेल्सिअस. महाराष्ट्र राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून, वयोवृद्ध लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. उष्माघातापासून राज्यातील नागरिकांनी सावध राहावे व योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. राज्यातील पुढील काही दिवस, तापमानात वाढच होण्याची चिन्हे दिसत आहेत.