जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक ,शिक्षकेतर समन्वय संघटनांच्या वतीने ,जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी,14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीसाठी केलेल्या संपाच्या कालावधीतील वेतन कपात होणार नसून, सर्व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा मंजूर करून ,कर्मचाऱ्यांचे वेतन आदा करावे, अशी मागणी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीतर्फे करण्यात आली होती .यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने ,संप कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतला असून, या कालावधीतील वेतन कर्मचाऱ्यांना मिळेल अशी माहिती कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव पी.एन. काळे यांनी दिली आहे .
त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने राज्यात ,राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, 3 महिन्यानंतर परत पुन्हा संप अटळ असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव पी. एन. काळे यांनी दिली आहे .यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष डी.जी.मुलानी ,एस .एच. सूर्यवंशी, बाबासाहेब लाड, सुधाकर माने, सयाजीराव पाटील, अमोल शिंदे, राजेंद्र नागरगोजे, रवी अर्जुन, राजेंद्र कांबळे, रमेश धुमाळ आदी उपस्थित होते.