जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगलीतील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाच्या चैत्रियात्रेनिमित्तचा सासनकाठी व पालखी सोहळा महाराष्ट्र,तामिळनाडू ,कर्नाटकातून आलेल्या लाखो भक्त भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री.सिद्धनाथाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातून लाखो भक्त भाविक खरसुंडी उपस्थित झाले होते.
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री.सिद्धनाथाच्या मानाची लोखंडी शासनकाठी नवसाची सासनकाठी व पालखी सोहळा हे या चैत्री यात्रेतील श्री सिद्धनाथाच्या यात्रेतील मुख्य आकर्षण होय. सर्व शासनकाठ्या ह्या नवसाच्या असून शासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची उधळण होत असते. खरसुंडी येथील श्री. सिद्धनाथाच्या मंदिराचा परिसर हा गुलालाच्या उधळणीने गुलाबी होऊन गेला होता. दरम्यान आटपाडी येथील श्री. सिद्धनाथाच्या यात्रेची सांगता मंगळवारी रथोत्सवाने होणार आहे .