जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून, महाविकास आघाडी ही मजबूत पायावर भक्कम उभी आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडी मार्फत वज्रमुठ सभा होणार असून 16 तारखेला नागपुरात महत्त्वाची सभा होत आहे. नुकतीच छत्रपती संभाजी नगर मध्ये यशस्वी सभा झाली होती.
राज्यातील मुंबईसह इतर जिल्ह्याच्या ठिकाणी महाविकास आघाडी तर्फे वज्रमुठ सभा होणार आहेत .राज्यातील महाविकास आघाडीच्या जनमानसातील वाढत्या प्रभावामुळे, आमचे विरोधक धास्तावले असून ,आघाडी मतभेद असल्याचा वारंवार बऱ्याच ठिकाणी, विरोधक नेत्यांच्याकडून उल्लेख केला जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील झालेल्या भेटीचा विपर्यास केला जात असून ,यासाठी वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे .महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही भक्कम पायावर उभी असून ,आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून ,आघाडीमध्ये सुसूत्रता आहे .शिवाय महाविकास आघाडीचे घटक असलेल्या आमच्या सर्वपक्षीय नेत्यांची नेहमी चर्चा होत असते, याचा गैरअर्थ काढून एखादे भाष्य करणे चुकीचे आहे.