जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्रात येत्या एप्रिल ते जूनच्या दरम्यान ,उष्णतेची मोठी लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून ,पश्चिम महाराष्ट्रात सह कोकण व इतर ठिकाणी अधिक तापमान नोंदवले जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे .महाराष्ट्रातील नागरिकांनी एप्रिल ते मे च्या दरम्यान, उष्णतेच्या लाटेमुळे संभाव्य स्थितीच्या उष्माघातापासून, सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहून, कोठेही ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पावसाची शक्यता नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कुठेही ढगाळ वातावरणाची चिंता बळीराजांनी करू नये अथवा घाबरून जाऊ नये, कारण कोठेही अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता नाही असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. मागील काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ,शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाची मिळालेली मदतही अत्यंत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.