जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार पासून," जय भारत सत्याग्रह" आंदोलन सुरू करण्यात येणार असून, त्याची पहिली सुरुवात सोमवारपासून ठाण्यातून सुरू होईल असे ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काल झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितले.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारी समितीची बैठक, सोमवारी सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत होणार असून, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेते व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारी समितीच्या बैठकीत सोमवारी, सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत बैठक होणार असून, त्या बैठकीत सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप, बरेचसे ठराव बैठकीत होणार असल्याचे समजते. त्याबरोबरच नवी कार्यकारिणी ही जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.