जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)महाराष्ट्र राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस ४-५ दिवसात होणार असून ,मध्य महाराष्ट्र -मराठवाडा- कोकण आदी भागात अवकाळी पावसाची व गारपीटीची फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केली आहे .
दरम्यान हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या अंदाजाप्रमाणे दक्षिण- मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गेले काही दिवस, दिवसाचे तापमानाचा पारा कमालीचा चढलेला आणि रात्रीच्या वेळेला थंडीचे वातावरण, यामुळे साथीचे रोगांचे प्रादुर्भाव अगोदरच चालू झाले आहेत. राज्यातील नागरिक सर्दी, ताप, घसा दुखणे ,घसा खवखवणे, खोकला आदिने त्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका, पिकांना बसण्याची शक्यता आहे. अगोदरच गेले काही महिने अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे, शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्याच्या काही भागात, अजूनही नुकसानग्रस्त झालेला शेतकरी, मागच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे उभारला नसून, त्यात ही आणखी भर घालणारी बळीराजाची चिंता वाढणारी गोष्ट आहे.