जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान असलेल्या गुजरात राज्यातील गिरनार या स्थानानंतर, प्रथम अवतार धारण केलेल्या परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामी यांचा जन्म ,श्री क्षेत्र पिठापूर आंध्र प्रदेश येथे झाला. श्री क्षेत्र पिठापूर येथील बाल्याअवस्थेतील असलेल्या लीला , महिमा अवर्णनीय व अगाध आहेत. स्वतः परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांचा जन्म हा, श्री क्षेत्र पिठापूर येथील अत्यंत -सात्विक- धार्मिक- निर्विकार- धर्मपतिव्रता असलेल्या माता सुमतीच्या पोटी, श्राद्धांनाची भिक्षा घेऊन, वर देऊन, मानवी कल्याणासाठी, जगदोद्धारासाठी भाद्रपद शुद्ध चतुर्थीस अवतार धारण केला आहे. वयाच्या 8 वर्षी पर्यंत परम गुरु भगवान श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामी हे, माता- पित्याच्या सेवेत राहून, 8 वर्षी मौंजीबंधन झाल्यानंतर, दोन्हीही भावांच्यावर मातापित्यांचे उत्तरदायित्व सोपवून, माता पित्यांना दिलेल्या पूर्वजन्मीच्या वचनाप्रमाणे , तीर्थक्षेत्रांच्या यात्रेस निघाले. जवळपास 8 ते 16 वर्षापर्यंत तीर्थक्षेत्री म्हणजे काशी, बद्रिकेदार, गोकर्ण महाबळेश्वर, इत्यादी प्रसिद्ध ठिकाणी अनुष्ठान-तप करून भ्रमण करीत, स्वतःच्या पूर्व संकल्पित तीर्थक्षेत्र असलेल्या म्हणजे तपोभूमी व दत्तप्रभूंच्या राजधानी असलेल्या, श्रीक्षेत्र कुरुपुरास आले .जवळपास 16 वर्षे श्रीक्षेत्र कुरवपूरास तपोसाधना करून, वयाच्या 32 व्या वर्षी कृष्णाचे नाभीस्थान असलेल्या कृष्णामाई नदीत, गुरुद्वादशीस निजानंदी गमन केले. व आपल्या पहिल्या अवतार कार्याची समाप्ती केली.
दत्तप्रभूंची राजधानी व तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपुरास रात्रीच्या वेळी अनेक देवता येऊन, श्रीपाद प्रभूंची सेवा करीत असतात .सकाळी काकड आरती होताच परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामींचा आशीर्वाद घेऊन ,स्व:स्थानास तपासाठी जातात. हिमालयातून काही योगीं सुद्धा यापूर्वी कृष्णेच्या पाण्यावरून चालत येऊन, परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामींचे दर्शन घेऊन गेल्याचे सर्वश्रुत आहे. परमगुरु भगवान श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी गुप्त रूपाने, श्री क्षेत्र कुरवपुरास अजूनही अधिवास करून गुप्त रूपाने राहून ,भक्तांच्या परमोद्धार करण्यासाठी राहिले आहेत. परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतार कार्यावर, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ, स्वतः परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांच्या मातामहपिढी कडील 33 व्या पिढीतील परमपूज्य तीर्थरूप मल्लादिगोविंद दीक्षितलू यांच्याकडून प्रसिद्धीस आला आहे. मूळ ग्रंथ संस्कृत मध्ये होता ,त्याचे मराठीमध्ये अनुवादित झाले असून, हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ, परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभूंच्या अवतार कार्याविषयी संपूर्ण माहितीचा व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सिद्धग्रंथ आहे.
आजही असंख्य दत्तभाविक या ग्रंथाचे नित्यनेमाने वाचन करीत आहेत. मागील जन्मी परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभूंच्या सेवेत व पूर्वजन्मी अनुग्रहित असलेल्या भक्तांना, श्रीक्षेत्र कुरवपुरास स्वतः परमगुरू श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेय स्वामी आज्ञा देऊन दर्शन देतात हे सांगणे मला येथे महत्त्वाचे नमूद करण्यास वाटत आहे. जन्मोजन्मीच्या पुण्याईच्या फळानेच व पूर्वजन्म सेवा अनुग्रहित भक्तांना, परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामींचे दर्शन लाभते.
श्री क्षेत्र कुरवपूर येथे परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामी असताना, रविदास या एका रजकास स्वतः प्रभूंचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते. प्रभुंच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या. या सर्व गोष्टींच्या निवारणासाठी, रजक रविदास याने प्रभूंच्या चरणाचा आश्रय घेऊन, स्वतः जीवन मुक्त झाला. जन्मोजन्मी विशाल महासागराच्या जन्मफेऱ्यातून पूर्व संकल्पित आज्ञेने श्रीक्षेत्र कुरवपुरास येऊन ,परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होणे हा परमोद्धारचा भाग म्हणावा लागेल. केवळ पूर्वजन्मीच्या सुकृतांचा हा खेळ आहे. या क्षेत्रास कर्नाटकात करूगड्डी, महाराष्ट्रात कुरवपूर व आंध्रामध्ये कुर्मगडा असे म्हटले जाते. प्रत्येक सद दत्तभक्तांनी धर्माप्रमाणे आचरण करून, पूर्वजन्मी पापांचा पुण्यकर्मान्वये क्षय करून ,कर्माचा कर्ताभाव स्वतःकडे न ठेवल्यास, केलेली सेवा परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्तात्रेय यांच्याकडे पोहोचते .श्रीक्षेत्र कुरवपूरास सध्या पुजारी म्हणून परमपूज्य तीर्थरूप वासुदेव गुरुजी, मंजुनाथ गुरुजी, अवधूत भट गुरुजी, रवीभट गुरुजी व राजू भट गुरुजी हे असून ,हे सर्व कुटुंबीय पिढ्यान पिढ्या ,परमगुरु भगवान श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांच्या सेवेत आहेत.
आपणा सर्व दत्त भक्तांना ,या परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामींच्या श्रीक्षेत्र कुरवपूरास जाऊन, महदभाग्य परमोद्धार दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी प्रभूंच्या चरणी प्रार्थना.