जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये ज्योतिबा फुले यांच्या जयंती निम्मित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज व युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा वक्त्या कु.अलिशा मोहिते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.यावेळी युवा वक्त्या अलिशा मोहिते म्हणाल्या की,आजची जयंती महात्मा फुले यांचे चरित्र वाचून साजरी झाली पाहिजे.महात्मा फुले पुरोगामी चळवळीचे मानदंड आहेत त्यामुळे त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेत आम्ही पुरोगामी चळवळ गतिशील केली पाहिजे.
यावेळी नगरसेवक हरिदास पाटील , कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे , उत्तम कांबळे , अनिता पांगम वंदना चंदनशिवे , वैशाली कळके , छाया जाधव ,समीर कुपवाडे ,धनंजय पाटील ,उमर गवंडी , आयुब बारगिर , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , विद्या कांबळे ,संगीता जाधव , स्वाती शिरूर ,तेजश्री अवघडे , अर्जुन कांबळे , रामभाऊ पाटील ,अरुण चव्हाण ,अक्षय शेंडगे , विजय जाधव ,दत्ता पाटील , फिरोज मुल्ला, बजरंग कदम ,कुमार वायदंडे ,अजित पाटील ,अमित घाडगे ,अभिजित रांजणे रुपेंद्र जावळे , आदी उपस्थित होते.