जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परमपूज्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सोबत सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात व संभाव्य महाराष्ट्र राज्यातील राजकीय मिशनच्या संदर्भात आढावा बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत .
परमपूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची असणार आहे. महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय परिस्थितीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.