जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
पुण्यात आज ,पुणे रेल्वे स्थानकावर भारत गौरव रेल्वेला, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून, जगन्नाथ पुरी, गंगासागर, दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या रेल्वेला रवाना केले. भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या माणसांना, धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी- जाण्यासाठी, अत्यंत माफक दरात भारत गौरव रेल्वेच्या रूपाने विशेष सेवा यात्रा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भारतातील मोदी सरकारने, देखो आपना देश तसेच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पना ना चालना देण्यासाठी व मध्यमवर्गीयांना रेल्वे धार्मिक स्थळांच्या विशेष यात्रा घडवण्याच्या उद्देशाने, या भारत गौरव रेल सेवा रेल्वेच्या रूपाने, खऱ्या अर्थाने विशेष यात्रा सेवा देण्याचा उपक्रम केला आहे.
दरम्यान भारत गौरव रेल सेवा विशेष यात्रेच्या इरूपाने, मध्यमवर्गीय नागरिकांना 10 दिवसांची रेल्वे सफर, विशेष धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आयोजन केले असून, जगन्नाथ पुरी, कोलकत्ता, गया ,वाराणसी, प्रयागराज अशा विविध धार्मियतक स्थळांचे दर्शन या विशेष सेवा यात्रेच्या रूपाने घडणार आहे. भारतातील मध्यमवर्गीयांना विशेषतः धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी, तसेच पर्यटन स्थळांच्या संकल्पना ना चालना देण्यासाठी भारत गौरव रेल सेवा विशेष यात्रेच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. एकंदरीत भारत गौरव रेल्वे सेवा विशेष यात्रेला, नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.