जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्यातील अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे, शेतकऱ्यांचे जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्यांच्या मदतीकरता, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने, आपल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आपले एक दिवसाचे वेतन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करून, शेतकऱ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांचे, एप्रिल 2023 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन ,हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वर्ग करण्यात यावे व तसे निर्देश संबंधित खात्यास देण्यात यावेत ,असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्याचबरोबर या पत्रात एक दिवसीय वेतन कपात करण्यासंदर्भात,संबंधित खात्यास निर्देश देण्याची विनंती ही महासंघाने केली आहे .
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही, राज्यातील विविध खात्यांमधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 संघटनांची शिखर संघटना आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतलेल्या, एक दिवसीय वेतन कपात करून, शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्याचा जो निर्णय घेतला आहे, हा एक राज्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल.