जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )सांगलीतील आरटीओ कार्यालयाच्या दारातच,आज सावळी आरटीओ विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या हळदीचा, सरळ थेट लिलाव स्वरूपातील आंदोलन, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांनी जगावं का मरावं? याचा विचार शासनाने एकदा केला पाहिजे, असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील शेतकरी शिवाजीराव यादवराव वने हे, आपली हळद सांगलीत विक्रीसाठी घेऊन येत असताना, इस्लामपूर येथील पेठ नजीक ,सांगलीच्या आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून, ज्यादा शेतमाल गाडीत भरल्याचा ठपका ठेवून, हळदीची गाडी जप्त केली. सांगलीतील सावळी येथील आरटीओ कार्यालयाकडे जप्त केलेल्या हळदीची गाडी नेण्यात आली .सांगलीतील सावळी येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून, सुमारे 30,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही गोष्ट माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कळताच, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सावळी येथील आरटीओ कार्यालय गाठले व सावळी येथील आरटीओ कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेल्या हळदीचा थेट सौदा, आरटीओ विभागाच्या दारातच चालू करून, एक अनोखे आंदोलन केले. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी परिवहन खात्याच्या कारभारावर व राज्य सरकारवर जोरदार टीका करून, राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी जो प्रचंड अडचणीत आला आहे, त्या पाठीमागची भूमिका विशद केली. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांनी जगावं का मरावं? असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा सरकारने त्वरित लक्ष घालून थांबवावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे .दरम्यान सदरहू जप्त केलेल्या हळदीचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता गृहीत धरून, आरटीओ अधिकाऱ्याने दंड कमी करून हळदीचा वाहतूक करणारा टेम्पो सोडून दिला असल्याचे वृत्त आहे.