जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याला खरीप हंगामासाठी लागणारा खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, राज्यातील शेतकऱ्यांनी मातीचा कस तपासून, निकषानुसार खतांचा संतुलित वापर करावा असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. आजच्या घडीला राज्यात 21 लाख 31 हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध असून, जवळपास राज्याला लागणाऱ्या खरीप हंगामाच्या खताच्या मागणीच्या, 50 टक्के साठा उपलब्ध आहे .यंदाच्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी, राज्याला आणखी जवळपास 43 लाख 13 हजार मॅट्रिक टन खत उपलब्ध होणार आहे अशी ही माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी ,जमिनीच्या कशाच्या बाबतीतला तपासणीचा अहवाल प्राप्त करून घेऊन, खताचा संतुलित वापर करणे आवश्यक असून, राज्याच्या यंदाच्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी, खतांचा विपुल प्रमाणात साठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खत टंचाईला सामोरे जावे लागत असते. शिवाय योग्य वेळी खताचा पुरवठा होत नसल्याने ,शेतकऱ्यांना फार मोठी, शेतीसाठी लागणाऱ्या खत पुरवठ्याची अडचण होत असते.