जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरच्या दुर्घटनेची, निवृत्त न्यायाधीशांनी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे .खारघर दुर्घटनेमध्ये अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला असून, त्याची सर्व जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कडक उन्हाच्या वेळी गर्दी जमवून आपल्याला पाहिजे तसे अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा डाव शिंदे फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे .राजकीय पक्षाची शिबिरे घेताना उन्हाळ्याची काळजी घेतली जाते, तरी या ठिकाणी काळजी का घेतली गेली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
दरम्यान राज्य सरकारने खारघर दुर्घटनेची चौकशी अधिकाऱ्यांच्या समितीकडून करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी कोणताही अधिकारी राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नसल्याचा शक्यता गृहीत धरून खारघर घटनेची सत्यता जनतेसमोर येण्यासाठी निवृत्त न्यायाधीशानमार्फत चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे.सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा मध्ये निष्पाप 40 जवानांचा मृत्यू झाला असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. आज देशात सत्तेचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रत्येक ठिकाणी ईडी मागे लावण्याची धमकी दिली जात आहे. शेवटी कोणावरही अन्याय झाला तर त्याच्या मागे ताकतीने उभे राहिले पाहिजे व त्या प्रवृत्ती विरोधात लढावयास कितीही किंमत द्यावी लागली तरी चालेल असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.