जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
कर्नाटक विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ उमेदवारांची यादी, नुकतीच जाहीर करण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून उत्तमराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर, घड्याळ या चिन्हावर पहिलीच कर्नाटक विधानसभेच्या निमित्ताने, निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे, घड्याळ हे चिन्ह कायम ठेवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर निर्णय देण्यात आला असून, घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी यापुढे निवडणूक लढवण्यासाठी देण्यात आलेले आहे.
कर्नाटक विधानसभेच्या पहिल्या नऊ यादीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची घोषणा, नुकतीच करण्यात आली असून ,बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघात पहिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तमराव पाटील यांच्या रूपाने दिला आहे. वास्तविक पाहता उत्तमराव पाटील हे काँग्रेस मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु काँग्रेसने निपाणी मतदारसंघात काका पाटील यांना उमेदवारी दिल्याने ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तमराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने निपाणी मतदारसंघातून शशिकला ज्वोल्ले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तमराव पाटील हे एक खंदे उद्योजक व साखर कारखानदार असून, अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून, त्यांचे निपाणी मतदारसंघातील कार्य उल्लेखनीय आहे. निपाणी मतदारसंघात उत्तम पाटील फाउंडेशनचे कामही, युवक व महिलांसाठी केलेले, उल्लेखनीय म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निपाणीतील उमेदवार उत्तम पाटील यांचा निपाणी मतदारसंघातील संपर्क हा दांडगा असून, त्यांचे राजकीय नेटवर्कही फार मोठ्या प्रमाणात बळकट आहे. शिवाय कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची साथ त्यांना असणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा निपाणी मतदारसंघाची जवळचा संबंध येतो. मागील खेपेस आमदार हसन मुश्रीफ यांनी, काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना मदत केली होती. यावेळी मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकद झोपून देतील हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना देखील मानणारा एक वर्ग निपाणी मतदारसंघात असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे, उत्तमराव पाटील यांच्यासाठी निपाणी मतदारसंघात बहुतांश ठिकाणी सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले घोषित केलेले नऊ उमेदवार असे--
निपाणी- उत्तमराव पाटील, हिप्परगी- मन्सूर साहेब बिलगी, बसवान बागेवाडी -जमीर अहमद इनामदार, नागथन- कल्लाप्पा चव्हाण, राणीबेन्नूर- आर शंकर, येलबर्गा- हरी आर, बाेम्मनहल्ली- सुगुना के, वीरापेट- मंसूद फौजदार,नरसिम्हाहराजा-श्रीमती रेहाना बानो.