जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील कुडल संगम येथे आज बसव जयंतीनिमित्त, जगत ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन, दर्शन घेऊन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी नतमस्तक झाले. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सत्यासाठी लढले, सर्व समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांचे कार्य अमौलीक असून, आजच्या युगात समाजात सत्य सांगणे देखील खूप कठीण व धोक्याचे बनले आहे. सध्या परिस्थितीत लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी कुडल संगम येथे सांगितले. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्याचे कार्य व समाजापुढे सत्य सांगण्याचे कार्य ,अमौलिक असून, सत्यासाठी ते कायम पुढे आले होते.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी लोकशाहीचे व आत्मसमर्पण तत्वाचे रक्षण केले. समाजामध्ये अंधार असताना, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी, प्रकाशाचा मार्ग दाखवून समाजास दिशा देण्याचे कार्य केले. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी, आयुष्यभर जातीयवाद ,राजकारण, समाजाचे शोषण या पासून समाजास मुक्त केले. आजच्या युगात समाजासमोर सत्य सांगण्याचे भय निर्माण झाले असले तरी, 12 शतकात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हे डगमगले नाहीत. त्यांनी फार मोठी सामाजिक क्रांती, परिवर्तनीय बदल घडवून आणला होता. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हे अखंड आयुष्यभर सत्यासाठी लढले व समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांचे कार्य हे अमौलीक आहे .जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी वयाच्या 8 वर्षापासून, स्वतःची मते मांडून समाजाची जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, समाज शोषणमुक्त करण्यासाठी, समाज राजकारण विरहित करण्यासाठी, त्यांचे कार्य हे सदैव प्रेरणा देत राहील असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी यांनी आज, कुडल संगम येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगितले.