जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण व वाय. एस. आर. तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय. एस. शर्मिला यांची, सोमवार दि. 24 एप्रिल 2023 रोजी एका महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी, थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे .सोमवारी दि. 24 एप्रिल 2023 रोजी हैदराबाद येथे आंदोलना प्रसंगी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून कानाखाली मारण्या प्रकरणी, कारवाई करण्यात आली आहे.
वाय. एस. आर. तेलंगणा पक्षाच्या नेत्या व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस शर्मिला यांना सध्या हैदराबाद मधील, जुलाबी हिल्स पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले असून, 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हैदराबाद येथील विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयात जात असताना, पोलिसांनी त्यांना रोखले असता, वरील घटना घडली आहे. ए .एन .आय. या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओ व माहितीच्या आधारे, राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेच्या कथित पेपर लीग प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत चौकशी केली जात होती. त्यावेळी वायरसार तेलंगणा पक्षाच्या नेत्या व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण या एसआयटी कार्यालयात येत असताना, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर गैरवर्तन करत असल्याचे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवाय एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानाखाली त्यांनी लगावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.