जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
जागतिक क्रिकेटच्या जगतात दबदबा असलेलं नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. महेंद्रसिंह धोनी यांनी आज हैदराबादच्या विजयानंतर, आपण क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असल्याचे विधान केले आहे. भारताचे माजी कर्णधार असलेले महेंद्रसिंग धोनी हे वय वर्ष 41 असले तरी, अजूनही आयपीएलच्या सामन्यात त्यांची क्रेझ कायम आहे. आज चेन्नई येथे झालेल्या, चेन्नई संघ विरुद्ध हैदराबाद संघ या सामन्यात ,महेंद्रसिंह धोनी असलेल्या चेन्नई संघाने हैदराबाद संघावर विजय मिळवल्यानंतर, निवृत्तीचे संकेत दिले आहेत. चेन्नईतील चिदंबरम स्टेडियम मध्ये, आज हा सामना खेळवण्यात आला होता .त्यावेळी स्टेडियम क्रिकेट रसिकांनी खचाखच भरलेले होते. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार ऑइन मॉर्गन ने महेंद्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग संघातील अस्तित्व हे ,कायम अबाधित राहील आणि त्याची उणीव त्याच्या निवृत्तीनंतर कायम पदोपदी जाणवत राहील असे उद्गार काढले. महेंद्रसिंह धोनीची नेतृत्व शैली, मैदानावरचा संयमपणा या मूलभूत गोष्टी वाखाण्याजोगे असून ,ज्यावेळेस महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या जगतातून कायमची निवृत्ती घेईल, त्यावेळेला त्याची उणीव ही पदोपदी क्रिकेट जगतास जाणवत राहील, असे विधान इंग्लंडचा माजी कर्णधार आईन माॅर्गन व्यक्त केले.
दरम्यान महेंद्रसिंह धोनीच्या संकेतानंतर, त्याच्या चाहत्यासाठी हे विधान चिंतेचे ठरले आहे. क्रिकेट जगताच्या इतिहासात 41 वय वर्ष असलेल्या महेंद्रसिंह धोनी कडून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर, शिवाय क्रिकेट कारकीर्द अखेरच्या टप्प्यावर असल्याचे विधान झाल्यानंतर क्रिकेट जगतात एकच चर्चा सुरू झाली आहे. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा विशेषतः स्वतःच्या नावाची एक वेगळी अबाधित्व ओळख कायम ठेवली असून, एकमेव कुल कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याची नोंद अजरामर राहील यात तीळ मात्र शंका नाही.