कोल्हापूर( प्रतिनिधी) :- मिलिंद पाटील.
आज मनसेच्या वतीने बजाज फायनान्सच्या शाहूपुरीतील मुख्य कार्यालयात जवाब दो आंदोलन करण्यात आले.एका महिलेने १० हजार चा मोबाईल घेतलेला असताना, याच्या बदल्यात व्याजासह ५० हजार रुपये भरून देखील सदरच्या फायनान्स कंपनीकडून NOC लेटर देण्यास टाळाटाळ होत असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात शिरून संबंधितांना धारेवर धरलं.
सदरच्या ठिकाणी अचानक झालेल्या आंदोलनाने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष राजू दिन्डोर्ले, प्रसाद पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्स च्या मॅनेजरला प्रश्नांची सरबत्ती करत चांगलंच धारेवर धरलं. सदरचा व्हिडिओ शूटिंग करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियात देखील वायरल केला आहे. संबंधित घटनेसंदर्भात बजाज फायनान्स किंवा पोलिसांच्या कडून अजून कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही.