जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय वंशाचे अजय बंगा हे, जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून दिनांक 2 मे 2023रोजी कार्यभार स्वीकारणार असून, जागतिक बँकेच्या 25 सदस्य कार्यकारी मंडळांने, बुधवारी 3 मे 2023 रोजी, भारतीय वंशाचे अजय बंगा यांची, जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष पद भूषवणारे, पहिले भारतीय अमेरिकन तसेच शीख समुदायातील पहिल्या व्यक्ती असतील. भारतीय वंशाचे अजय बंगा हे 2 जून 2023 रोजी, जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
सध्याचे जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्याकडून ,भारतीय वंशाचे अजय बंगा हे अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेणार असून ,अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी, फेब्रुवारीच्या अखेरीस अजय बंगा यांचे नामांकन दिले होते. दरम्यान जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्यास, भारतीय वंशाचे अजय बंगा हे सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत. भारतीय वंशाचे अजय बंगा यांचा जन्म भारतात झाला असून, ते सुमारे 2007 सालापासून अमेरिकेचे नागरिक आहेत. अजय बंगा हे आय आय एम अहमदाबाद येथून एमबीए पदवी तसेच दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेज येथून ,अर्थशास्त्रातील पदवी घेतली आहे .भारतातील नेस्ले समूहामधून त्यांनी ,आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली असून, सिटी ग्रुप मध्ये सुद्धा काम केले आहे. भारत सरकारने सन 2016 रोजी, सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मश्री पुरस्कार देऊन, भारतीय वंशाचे अजय बंगा यांना सन्मानित केले होते.