जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
बंगालच्या उपसागरात सध्याच्या परिस्थितीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, 06मे 2023 रोजी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नवी दिल्ली येथे दिली.
यावर्षीतले हे पहिले चक्रीवादळ असून, हे चक्रीवादळ या महिन्याच्या 8 तारखेला दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात ,कमी दाबाच्या पट्ट्यात केंद्रित होण्याची शक्यता असून, मध्य बंगालच्या उपसागराच्या कडून उत्तरेकडे सरकताना, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आज नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांच्या समोर ,भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ,या पश्चिम बंगालच्या उपसागरात 6 तारखेला होणाऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेविषयी माहिती दिली. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला संपूर्णतः धोक्याचा इशारा देण्यात आला असून ,दि. 6 त पासून ते 9 तारखेपर्यंत पश्चिम बंगालच्या उपसागरात बोटी घेऊन जाऊ नयेत असे सांगितले आहे.