जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेले काही दिवस चर्चेत असलेल्या, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, भारतीय नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा, दि. 23 मे 2023 वार मंगळवारपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, एकावेळी 2 0,000 रुपये याप्रमाणे बँकेमध्ये भरून सध्याच्या अस्तित्वात असलेल्या चलनामध्ये बदलून देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा या 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच बँकेत जमा करण्यासाठी वैध असतील असे रिझर्व बँकेने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
त्याबरोबरच केंद्र सरकारच्या व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून व्यवहारासाठी तसेच बँकेकडून सुद्धा 2000 रुपयांच्या नोटेचा वापर क झाला होता. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या पत्रका नुसार 23 मे 2023 रोजी पर्यंत बँकेत एकावेळी 20,000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क असणार नाही. सन 2018 नंतर 500 रुपये नोटा व इतर नोटांची संख्या चलनात पुरेशी असल्यामुळे ,2000 रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँक ऑफ इंडियाने थांबवली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे आयुष्यमान ,2017 पूर्वी छपाई करण्यात आल्यामुळे संपत आले असून, शिवाय इतर नोटांची संख्या चलनात मोठ्या प्रमाणात असल्याने, 2000 रुपयांच्या नोटां चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार नोटाबदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ,महिलांना, अपंग व्यक्तींना गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय वरील संदर्भात तक्रारीचे निवारण होण्यासाठी, रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार नोंदवू शकता येते. एखाद्या नागरिकांचे बँकेत खाते नसेल तर एका दिवशी 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बँकेतून बदलून घेता येतील. दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा खात्यात कितीही भरता येऊ शकतील, परंतु केवायसीच्या आधीन राहूनच खात्यात जमा कराव्या लागतील.