जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार, गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना यापुढे, जीपीएस सिस्टीम बसवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंदराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसवण्यात येणारी जीपीएस सिस्टीम, ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया याद्वारे प्रमाणित केलेली असावी. स्टॅंडर्ड 140 (ए.आय.एस 140 )आय आर एन एस एस हे, प्रमाणित मानक असावे. अधिक माहितीसाठीhttps://mahakhanij.maharashtra.gov.in/GPS या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी.
तसेच त्याबरोबर जीपीएस सिस्टीम वाहनात बसवल्यानंतर, शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 020- 67 800 800 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून, जीपीएस सिस्टीम बसवणे लिंक करून घ्यावी. दि. 1 मे 2023 पासून, महाराष्ट्र शासनाने गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनास ,जीपीएस सिस्टीम बसवणे अनिवार्य केले आहे. यापुढे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनास जीपीएस सिस्टीम बसवली नाही तर, अवैध समजून योग्य ती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7),(8) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल .त्यामुळे यापुढे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या परवानाधारक वाहनांनी, प्रमाणित केलेली संबंधित जीपीएस सिस्टीम बसवून घेऊन, गौण खनिज वाहतूक करावी असे आवाहन ,कोल्हापूर जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंदराव पाटील यांनी केले आहे आहे.