जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
(अनिल जोशी)
समता बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व शोध अभियान अंतर्गत राष्ट्रीय महासन्मान पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा कार्यक्रम आयोजक बंडखोर मीडिया ग्रुप पेठ वडगांव जिल्हा कोल्हापूर मुख्य संपादक शिवाजीराव आवळे यांच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उद्घाटक माजी पोलीस आयुक्त पुणे गुलाबराव जी पोळ, प्रमुख पाहुणे भारत पेट्रोलियम लिमिटेडचे गोवा विभागीय डेप्युटी जनरल मॅनेजर मा.अभिजीत पानारी साहेब, वडगाव नगरीच्या नगराध्यक्ष मा. विद्याताई पोळ,सिने अभिनेत्री अश्विनी शिरोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 35 वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये विविध लोककला गीतांचा चित्रपट गाण्यांचा भरतनाट्यम वाद्य संगीताची जुगलबंदी तसेच लावणीचा भारदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक चार पुरस्कारांच्या वितरणानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी तसेच महिला उन्नती संस्था नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री देवी पाटील यांना अश्विनी शिरोळे सिने अभिनेत्री च्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांना तसेच विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बंडखोर मीडिया ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्रुती मॅडम यांच्या मधुर स्वराने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने झाली, व सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवरांना इंडियन रिपोर्टर असोसिएशन व महिला उन्नती संस्था नवी दिल्ली च्या वतीने खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन.