जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
मा. पंडित तुकाराम धायगुडे कळंबोली मुंबई यांचा दुसर्यांदा गिनिज बुक ऑफ रेकाॅर्डचा विक्रम ठाण्यातील धर्मवीर मैदानावर रविवारी सकाळी ८ वाजता साकारला जातोय.पंडित तुकाराम धायगुडे मुळ गाव जत, जि. सांगली. जत हा दुष्काळी भाग, कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आणि शेती पाण्यावाचून कायम पडिकच. पोटाची गरज भागविण्यासाठी देशभरातील लोक मुंबईत नशीब अजमावतात. जतमधील घरटी किमान एक व्यक्ती मुंबईत जावून काबाडकष्ट करुन राहिली.पंडीत धायगुडे हेही त्यापैकी एक. बॅंकेत चतुर्थ श्रेणी सेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपला साहसी खेळ, कराटे हा छंद मोठ्या ताकतीने कष्टाने, मेहनतीने जोपासला.१२१ इंडियन स्काऊट मोटर सायकल पोटावरुन घालविण्याचा गिनिज बुकमध्ये नोंदविणारा पराक्रम २०१६ मध्ये केला.
एक पराक्रम कर्तबगार माणसास शांत बसु देत नाही.--
आज वय चाळीस पार करुनही मुंबईतील धकाधकीच्या जीवनात चार-पाच तास अंगमेहनतीसाठी घाम गाळतात. त्यातुनच मा. पंडित धायगुडे यांचा येत्या रविवारी ७ मे रोजी दुसरे वर्ल्ड रेकाॅर्ड करण्याचा मानस पुर्ण होत आहे. आपण या साहसी विक्रमाचे "याची देही याची डोळा" विनामुल्य धर्मवीर मैदान, १२ बंगला, कोपरी काॅलनी, ठाणे (पुर्व) येथे सकाळी ८ ते ९.३० या वेळेत पाहावयास मिळणार आहे.मुंबईकरांनी आणि साहसी खेळावर प्रेम करणार्या महाराष्ट्रवासीयांनी आवर्जुन या कार्यक्रमास उपस्थित रहावे.त्यामुळे आपले कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी रविवारी धर्मवीर मैदान ठाणे येथे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.