जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्या चालू असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ,कोल्हापूर परिक्षेत्रात ४.४१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये 88 लाख रुपयांची रोकड, 35, 000 लिटर दारू ,2.25 लाखांचा गांजा, 3.25 कोटींचे रसायन, 5 लाख रुपयांची 11 पिस्तुले, गावठी कट्टे यांचा समावेश आहे .दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल 2890 लोकांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती ,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत करताना दिली.
कोल्हापूर ,सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीच्या सीमा वरती भागात, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तपासणी नाके उभे करण्यात आलेले असून, सीमावर्ती भागामध्ये, सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लगतच्या सीमावर्ती भागातील महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच अन्य मार्गावर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला असून ,सीमावर्ती भागात ठिकठिकाणी तपासणी नाके उभे केले आहेत. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या 15 दिवसात ही सर्वात मोठी कारवाई केली असे म्हणावे लागेल.